कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या ४ बनावट पोलीस अधिकार्‍यांना अटक !

उन्नतनगर येथील ‘आस्तिक ट्रेडिंग’ आस्थापनात ४ जण घुसले असून ते सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) आणि पोलीस यांचे ओळखपत्र दाखवून ५ लाख रुपयांची मागणी करत आहेत, अशी तक्रार गोरेगाव पोलिसांना ३० सप्टेंबर या दिवशी प्राप्त झाली होती.

दिवाळीनिमित्त शिधावाटप दुकानात शिधा वस्तूंचा संच देण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !

आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या आस्थापनांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘ईडी’च्या १०० कोटी वसुलीच्या प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन

कायद्यानुसार आरोग्याच्या कारणास्तव हा जामीन मागण्यात आला, तसेच ‘आरोपी क्रमांक १’ हे अनिल देशमुख होते, असे कुठेही दिसून येत नाही, कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही, असेही देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यात नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावे ! –  देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

फडणवीस म्हणाले की, राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून मांडले जावेत. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे.

मागील वर्षी महिलांना कुंकवाविना दाखवणार्‍या आस्थापनांनी यावर्षी दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासहित दाखवले !

धर्मप्रेमी हिंदूंनी तत्परतेने केलेल्या विरोधाचा परिणाम ! असा संघटितपणा आणि तत्परता हिंदूंनी प्रत्येकच आघाताच्या वेळी दाखवावी !

दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया ! – सुधीर मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार  

विलंबाने घेतलेला निर्णय असला, तरी ‘हेही नसे थोडके !’

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन एका युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.