हिंदूंनो, ‘हलाल’ ही इस्लामी अर्थव्यवस्था मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.

बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची नावे उघड करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी !

या गुन्ह्याची प्रत पोलीसदलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून मुलींची ओळख उघड करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक निर्देशाचे आणि पोक्सो कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.

दहीहंडी उत्सवातील घायाळ तरुणाचे निधन !

दहीहंडी उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा झाल्यास अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल !

 रावणदहन केले म्हणून भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद !

रावणदहनाचा कार्यक्रम केल्याच्या कारणावरून त्यांच्या स्थानिक विरोधकांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवल्याने त्यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील काल्पनिकता आक्षेपार्ह ! – हिंदु जनजागृती समिती

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच लक्षात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते.

#Boycott_Adipurush राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी !

हिंदुद्वेष्ट्या बॉलीवूडकडून हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होत असल्याने हिंदू त्या विरोधात ट्विटर आदी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत असतात; परंतु आता यावरच संतुष्ट राहून चालणार नाही, तर हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्यावर कुणी चकार शब्दही काढणार नाही, यासाठी हिंदूंनी स्वत:ची तशी पत निर्माण करणे आवश्यक आहे !

मुंबई आणि जामनगर (गुजरात) येथून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पालघर जिल्ह्यातून १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे ७७० किलो एम्.डी. पकडले होते.

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतात त्याविषयी आकांडतांडव करणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

विजयादशमीनिमित्त धारावी (मुंबई) येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन !

विजयादशमीनिमित्त धारावी येथील ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन लिमिटेड’ आस्थापनामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती या कर्मचारी  संघटनेच्या वतीने ४ ऑक्टोबर या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही !

धर्मरक्षणाची भूमिका घेणारे भाजपचे आमदार राम कदम यांचे अभिनंदन !