‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही !

भाजपचे आमदार राम कदम यांचे ट्वीट !

उजवीकडे भाजपचे आमदार राम कदम

मुंबई – ‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. (धर्मरक्षणाची भूमिका घेणारे भाजपचे आमदार राम कदम यांचे अभिनंदन ! – संपादक)

त्यांनी म्हटले आहे, ‘‘पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यांनी फालतू लोकप्रियता मिळवण्यासाठी आमच्या देवी-देवतांचा अपमान केला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे माफीनामा कि विडंबन ठरवण्याची ! हिंदूच्या भावना दुखावणारा कोणताही प्रयत्न भाजप खपवून घेणार नाही.’’

(म्हणे) ‘श्रीरामासमवेत असणारे रावणाचे हे युद्ध चित्रपटात न्याय्य ठरेल !’

अभिनेता सैफ अली खान यांचे राम-रावण युद्धाविषयी अज्ञानमूलक विधान !

अभिनेता सैफ अली खान

या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान म्हणतो, ‘‘रावणाने सीतामातेचे केलेले अपहरण चित्रपटात न्याय्य असेल. यामध्ये रावणाची मानवी बाजू दाखवली जाईल. प्रभु श्रीरामासमवेत असणारे रावणाचे हे युद्ध चित्रपटात न्याय्य ठरेल.’’