धर्मग्रंथ अभ्यासून पौराणिक चित्रपट सिद्ध करण्याची मागणी

मुंबई – ‘आदिपुरुष’ या प्रभु श्रीरामावर आधारित आगामी चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. काही जण या चित्रपटाचे समर्थनही करत आहेत. खरेतर प्रभु श्रीरामावर भव्य चित्रपट सिद्ध करणे, हे स्तुत्यच आहे; पण तो सिद्ध करतांना जर वास्तवाला फाटा देऊन काल्पनिकतेला महत्त्व दिले, तर असत्य इतिहास समाजावर बिंबवण्याचे पाप आपल्या माथी येते. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच लक्षात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते. प्रभु श्रीराम हे संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्यदैवत आहे. श्रीरामावर आधारित चित्रपट हा कलास्वातंत्र्याच्या नावाखाली काल्पनिक न बनवता धर्मग्रंथांचा अभ्यास करून बनवायला हवा, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
चित्रपटाच्या टीझरमधील हिंदु समाजाला न पटलेल्या दृश्यांचा निर्मात्यांनी समाजभावना म्हणून अभ्यास करावा आणि त्यामध्ये आवश्यक ते पालट करावा.
Bollywood का पूर्णतः बहिष्कार करने की आवश्यकता है !
फिल्म #Adipurush में रामायण का मजाक बनाया गया है, जो समस्त हिन्दुओं की धार्मिक आस्था को ठेस पहुंचाता है।
@prasoonjoshi_ जी से निवेदन है कि, इस फिल्म को प्रदर्शन की अनुमती न दें !#Boycott_Adipurush pic.twitter.com/QbekVppihP
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 8, 2022
टीझरमधील आक्षेपार्ह सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत !
१. हनुमानाची वस्त्रे चामड्याची दाखवणे, तसेच त्याने मुकुट धारण केलेला नसणे : याविषयी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही आक्षेप नोंदवला आहे. हनुमान चालिसेतील श्लोकांमध्ये हनुमानाच्या वस्त्रांचेही वर्णन आहे, त्याप्रमाणे हनुमानाची वेशभूषा असायला हवी; मात्र येथे तशी वेशभूषा केलेली नाही.
२. हनुमानाला दाढी दाखवली; मात्र मिशी नाही ! : अशी केशभूषा हिंदूंच्या कोणत्याही देवतांची नाही. याउलट मिशी न ठेवता दाढी ठेवणे, ही मुसलमानांची पद्धत आहे. हिंदु देवतेला असे दाखवणे हिंदु समाज कधीही सहन करणार नाही.
३. ‘स्लीवलेस’ (बाह्या नसलेल्या) वस्त्रांमध्ये माता सीता : माता सीतेसारख्या भूदेवीला असे दाखवणे अत्यंत अयोग्य आहे.
४. रावणाची व्यक्तीरेखा मोगलांप्रमाणे केलेली असणे : रावणाने तप करून शंकराला प्रसन्न केले होते, तो प्रकांड पंडित ब्राह्मण होता; मात्र अहंकार आणि दुर्जन प्रवृत्ती यांमुळे त्याचा नाश झाला. त्याची तुलना मोगल आक्रमकांशी कदापी करता येणार नाही.
५. रावणाचे पुष्पक विमान : हे ॲनिमेटेड, तसेच एका क्रूर पक्षाचे दाखवण्यात आले आहे. हे अत्यंत अयोग्य आहे.
दिग्दर्शक ओम राऊत यांनी यापूर्वी चांगले चित्रपट बनवले आहेत. त्यामुळे या चित्रपटातूनही त्यांनी चांगला प्रयत्न केलेला असू शकतो; पण ‘टीझर’मधून तरी वरील काहीच आक्षेप लक्षात आले आहेत. पूर्ण चित्रपटात आणखीही आक्षेपार्ह दृश्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हिंदु जनजागृती समितीची ओम राऊत यांच्याकडे मागणी आहे की, चित्रपट प्रदर्शनापूर्वी संत-महंत, इतिहास अभ्यासक, हिंदु संघटनांचे प्रतिनिधी यांना दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि मगच चित्रपट प्रदर्शित करावा. सध्या चित्रपटाविषयी वाद निर्माण करून गल्ला भरणारे अनेक चित्रपट निर्माते आहेत. ‘आपणही त्यांच्याप्रमाणे होऊ नये’, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !