मढ (मुंबई) येथील ४ मासांत सिमेंट काँक्रिटची पर्जन्य जलवाहिनी ढासळली

४ मासांत जलवाहिनी ढासळते, यावरूनच तिच्या बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट होता, याची कल्पना येते !

न्यायालयाकडून लटके यांचा राजीनामा आज संमत करण्याचा आदेश

न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना निर्णय घेण्यासाठी घंट्याभराचा अवधी दिला. त्यानंतर १४ ऑक्टोबर या दिवशी त्यांचा राजीनामा संमत करण्याचे आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिले आहेत.

बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर उभे रहाण्याची शक्यता

जानकर हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत. सध्या त्यांच्यासह आणखी एक असे दोनच आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत.

शालेय विद्यार्थ्यांकडे पाहून अश्‍लील हावभाव करणार्‍या मुसलमान टॅक्सीचालकाला अटक !

सिकंदर खान हा परिसरातील मुलांच्या शाळेसमोर स्वतःची टॅक्सी उभी करत असे. त्यांच्याकडे पाहून अश्‍लील हावभाव करत असे, तसेच काही वेळा तो मुलांचा पाठलागही करायचा.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याप्रकरणी दोघांना अटक

एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. आरोपींमध्ये नईमा अहमद उल्दय (वय ६२ वर्षे) आणि रज्जद नोरे याला अटक करण्यात आली आहे.

ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही !

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तिथे पोटनिवडणुका होणार आहेत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असून त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

ताडदेव (मुंबई) येथे बनावट पोलिसांनी वृद्धाला लुटले !

नवी मुंबई येथील रहिवासी विजय तुसलीदास गांधी (वय ७० वर्षे)  ताडदेव येथील ३५१ क्रमांकाच्या बस थांब्याजवळील ‘अंग्रेजी ढाब्या’समोर उभे होते. त्या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण विभागाचे) अधिकारी असल्याचे सांगितले.

मनसे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार !

महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.

अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार !

अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. राज्याच्या राजकारणातील पालटलेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

तुर्भे येथे ४ वीजचोरांकडून ६ लाख २९ सहस्र रुपयांची वसुली !

‘वीज’ या राष्ट्रीय संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर अशांना कारागृहात टाकण्याची शिक्षा केली, तरच कारवाईचा धाक निर्माण होऊन असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !