#Boycott_Adipurush राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी !

रामायणाचे अश्लाघ्य आधुनिकीकरण करणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात ट्विटरवर ट्रेंड !

मुंबई – आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ‘ट्रेलर’च्या विरोधात हिंदूंकडून संताप व्यक्त केला जात आहे. ट्रेलरमध्ये हिंदु देवतांचा अनादर करण्यात आल्याने भारतभरातील सहस्रावधी हिंदूंनी ८ ऑक्टोबरला #Boycott_Adipurush या नावाने हॅशटॅग ट्रेंड केला. काही वेळातच हा हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी ट्रेंड करत होता. या हॅशटॅगद्वारे ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेष्ट्या बॉलीवूडकडून हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होत असल्याने हिंदू त्या विरोधात ट्विटर आदी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत असतात. त्यास काही प्रमाणात यशही मिळत आहे; परंतु आता यावरच संतुष्ट राहून चालणार नाही, तर हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्यावर कुणी चकार शब्दही काढणार नाही, यासाठी हिंदूंनी स्वत:ची तशी पत निर्माण करणे आवश्यक आहे !