तमिळनाडूतील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक

चिन्न सुब्बाराव अयनार (वय २४ वर्षे) या हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे अशा ८ हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तमिळनाडूमधील कुख्यात गुंडाला चेंबूरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पकडले.

धर्मादाय रुग्णालयांतील खाटांची घरबसल्या माहिती

उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाच्या ऑनलाईन प्रणालीचे २ ऑक्टोबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील सस्मिता इमारतीमध्ये उद्घाटन झाले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार !; सेवानिवृत्त पोलिसाला वेतन चालूच !

जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार ! जळगाव – गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये असून राज्यशासनाने नुकतेच प्रतिलिटर ७ रुपये अनुदान घोषित केले आहे; मात्र ‘जिल्हा दूध संघा’ने ३० रुपये प्रतिलिटर खरेदीदर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. संघाकडे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी ३७ रुपये प्रतिलिटर … Read more

शासनाच्या नावाने खोटी प्रशस्तीपत्रके आणि आदेश काढणारे गट कार्यरत !

शासनाच्या नावाने खोटी प्रशस्ती पत्रके आणि खोटे शासनआदेश (जीआर्) काढणारे गट कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या नावे ‘महावाचन उत्सव २०२४’ या नावाखाली टंकलेखन, शुद्धलेखन, व्याकरण, आणि वाक्यरचना यांच्या एकूण २९ चुका असणारे एक प्रशस्तीपत्रक समाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आले.

लैंगिक छळाप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचे स्थानांतर, चौकशीचे आदेश

मुंबईतील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती.

महाराष्ट्रात साधूसंतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

३० सप्टेंबर या दिवशी मीरा-भाईंदर येथे भागवत सत्संग – सनातन राष्ट्रसंमेलनामध्ये भाषण करतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी समतेच्या मूल्यांचा अवमान केला ! – नाना पटोले, काँग्रेस

काँग्रेस मतांसाठी आणखी किती मुसलमानांचे लांगूलचालन करणार ?

पायाला गोळी लागून अभिनेते गोविंदा घायाळ !

या वेळी गोविंदा यांच्या अंगरक्षकाने त्यांना अंधेरी येथील ‘क्रिटिकेअर’ रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.

गरब्याच्या ठिकाणी मुसलमानांना प्रवेश देण्यात येऊ नये ! – विश्व हिंदु परिषद

मुसलमानांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, असे विश्व हिंदु परिषदेच्या प्रतिनिधींनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.