मुंबईतील प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या वास्तूच्या भिंतींना तडे !

या वास्तूच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकार समोर आला.

विशेषाधिकार भंगाच्या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी संजय राऊत यांना विधापरिषदेतही मुदतवाढ !

खासदार संजय राऊत यांना विधीमंडळाने दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटिशीवर स्पष्टीकरण देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ९ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली.

राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा, अर्ध्याहून अधिक पदे रिक्त !

राज्यात भेसळयुक्त दूध पडताळण्यासाठी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागासाठी ३५० पदे संमत आहेत; मात्र १८८ जागा रिक्त आहेत. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने पडताळण्यासाठी राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा आहेत, अशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची दूरवस्था सांगणारी माहिती या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

स्‍त्रियांनी राजकारणात यावे, त्‍यांना संधी देण्‍यास मनसे उत्‍सुक ! – राज ठाकरे

देशाची अर्थव्‍यवस्‍था, परराष्‍ट्र व्‍यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्‍ट्रपतीपदी स्‍त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्‍त्रियांनी राजकारणातही यायला हवे.

६२ दिवसांत लाचखोरीचे ४९ सापळे रचून ७० लाचखोरांना अटक !

नाशिक विभागाने केलेले लाचखोरीसाठीचे प्रयत्न सर्वत्र झाल्‍यास देश लवकरच भ्रष्‍टाचारमुक्‍त होईल !

कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा !

शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्‍या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवले

भारतीय नौदलाच्या ‘स्वदेशी ध्रुव’ हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. या हेलिकॉप्टरमधील तिघा जणांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले.

मुंबईमध्ये बनावट संदेशाद्वारे ४० नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची लुट !

मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगजेबाचे फलक फडकावून आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍यांवर कारवाई करू ! – चंद्रकांत पाटील, मंत्री

छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !

महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत 

देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्‍यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.