नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी !
मुंबई – अवघ्या ६२ दिवसांत लाचखोरीचे ४९ सापळे रचून ७० लाचखोरांना अटक करण्यात राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाही विभागांत नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधकाच्या नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाचे दायित्व शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडे आहे. हे दायित्व प्रथमच एका महिलेकडे आलेले आहे. त्यांच्या समवेत १७ अधिकारी आणि कर्मचारी याही महिलाच आहेत. महिलांची नेमणूक झाल्यापासून त्यांच्याकडून दिवसाआड कारवाई होत असते. त्यामुळे प्रतिदिन एका लाचखोराला पकडले जात आहे. ‘सांघिक यशामुळे सर्वाधिक कारवाई केली जात आहे’, असे शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|