नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे सावट !

साहित्य संमेलन आणि ‘ओमिक्रॉन’ विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली असून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कठोर निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

साहित्य संमेलन कि धर्मद्रोह्यांचा अड्डा ?

साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाची ‘डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन ‘ऑनलाईन’ माध्यमातून रसिकांपर्यंत पोचवणार !

एकाही कार्यक्रमापासून साहित्य रसिक वंचित राहू नयेत, यासाठी संमेलनाची ‘सोशल मीडिया-डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत पोचवणार आहे !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेते उपस्थित रहाणार असल्यामुळे साहित्यिक अप्रसन्न !

संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ऑनलाईन’ करणार असून संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये शाहीर परदेशी यांच्याऐवजी अज्ञाताचे छायाचित्र !

संमेलनात विविध गोष्टींवरून वाद चालूच आहे. यामुळे साहित्यिकांच्याच अगाध (?) ज्ञानाचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडत आहे.

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पालकमंत्र्यांसह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार आहेत. आमदारांनी विशेष गोष्ट म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद . . .

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा हिंदुविरोधी लोकांना सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’

५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहूनही ‘मराठी’ न येणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

मराठी भाषेसाठी योगदान देणार्‍यांनाच मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित करणे उचित आहे ! गेल्या अनेक वर्षांपासून तसे होत नसल्यामुळेच साहित्य संमेलनाची पत झपाट्याने घसरत आहे ! याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

मराठी साहित्य संमेलनाच्या गीतात केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख !

संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्मिती करण्यात आलेल्या या गीतात ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असतांना सावरकरांचे नाव का नाही ?’, असा प्रश्न सावरकरप्रेमींनी व्यक्त केला होता.