अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये शाहीर परदेशी यांच्याऐवजी अज्ञाताचे छायाचित्र !

नाशिक – येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये शाहीर प्रताप परदेशी यांच्या ऐवजी चक्क एका अज्ञाताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संमेलनात विविध गोष्टींवरून वाद चालूच आहे.

यामुळे साहित्यिकांच्याच अगाध (?) ज्ञानाचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडत आहे. अशा घटनांमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे.