नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार्या एकाही कार्यक्रमापासून साहित्य रसिक वंचित राहू नयेत, यासाठी संमेलनाची ‘सोशल मीडिया-डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत पोचवणार आहे.
Nashik | साहित्य संमेलनाची डिजीटल कात; चक्क घरात बसून पाहता येणार, कसे घ्या जाणून…!https://t.co/Bfebd2cfYM | #Nashik | #maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2021
या संमेलनातील ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कवीकट्टा, कवीसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद, बालसाहित्य मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संमेलनाचे अधिकृत ‘सोशल मीडिया पेज, युट्यूब चॅनल आणि संकेतस्थळ’ यांवर थेट पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनात आलेल्या रसिक आणि निमंत्रित यांच्याशी आयोजक थेट गप्पा मारणार आहेत. रसिकांना घरी बसून संमेलनाचे कार्यक्रम पहाता येतील. साहित्य संमेलनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘ऐसी अक्षरे’ हा सुलेखनावर आधारित प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम ४ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.