देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळली जाईल ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करून दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्याचे काम गृह विभागाकडून चालू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ९ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली.

सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून लक्ष्य करत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर केले !

गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याचा कट, तर मला संपवण्याचा प्रयत्न !

आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवार यांसह अनेक मंत्री सहभागी आहेत.

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी ९ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला.

गडकिल्ल्यांसाठी संवर्धनाचे काम करतांना शिवभक्तांसह संस्थांना अनुमती देण्यास पुरातत्व विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिवसेना

गडदुर्ग हे शिवभक्तांसाठी प्रेरणास्रोत आहेत. राज्यात असणारे काही गडदुर्ग हे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या, तर काही राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहेत. याशिवाय अनेक गडदुर्ग कोणत्याही विभागात नोंदवलेले नाहीत.

मौजे पाभळ (जिल्हा यवतमाळ) येथील शिधावाटप दुकानावर निलंबनाची कारवाई ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !

राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये उभारणीसाठी ‘हुडको’कडून ४ सहस्र कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील आरोग्य विभागाच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.

‘वेब सिरीज’च्या संदर्भात ‘सायबर क्राईम’कडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई होईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य

पोलीस प्रशासन ‘कुणी तक्रार प्रविष्ट करेल मग आम्ही कारवाई करू’, अशी भूमिका का घेत आहे ? असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे गुन्हा करण्यास दिलेली सवलतच आहे !

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी !

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपला  महाविकास आघाडीची भीती वाटू लागली आहे. तेव्हापासून या धाडी चालू आहेत.

मुंबई येथील पुनर्वसनात रखडलेल्या ५२३ झोपडपट्ट्यांसाठी नवी अभय योजना सिद्ध केली ! – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

कुर्ला (पश्‍चिम) येथील प्रिमियम आस्थापनाच्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्‍न आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.