चंद्रपूर येथील १४ एस्.टी. कर्मचार्‍यांचे निलंबन !

एस्.टी.च्या संपाविषयी राज्य सरकारची पहिली कारवाई !

चंद्रपूर – गेल्या १३ दिवसांपासून राज्यातील एस्.टी. कर्मचार्‍यांनी चालू केलेला बेमुदत संप अद्यापही चालूच आहे. ९ नोव्हेंबर या दिवशी राज्य सरकारने येथील १४ संपकरी कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या ३ घटकांतील कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे. या कारवाईमुळे एस्.टी. कर्मचारी संतप्त झाले आहेत. ‘आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचे फळ दिले आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया एस्.टी. कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. ‘३६ एस्.टी. कर्मचारी हुतात्मे झाले आहेत. त्यापुढे हे निलंबन क्षुल्लक आहे’, असेही एस्.टी. कर्मचार्‍यांनी म्हटले. ‘एस्.टी. महामंडळ संपाविषयी अवमान याचिका प्रविष्ट करणार आहे’, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.