चंद्रपूर येथे बस कर्मचार्याची विष प्राशन करून आत्महत्या !
राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी १३ दिवसांपासून महामंडळातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे.
धाराशिव येथे एस्.टी. कर्मचार्यांचे बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन चालू !
धाराशिव जिल्ह्यातील ६ बस आगारांपैकी ५ आगार आंदोलनामुळे बंद असून परिवहन मंडळाची ३० लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली !
कर्मचार्यांच्या आत्महत्येला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे’, असा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी याप्रसंगी केला.
जाफराबाद (जिल्हा जालना) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !
आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळ, तसेच सरकार यांच्या विरोधात घोषणा देऊन शिवीगाळ केली. यामुळे एस्.टी.च्या अधिकार्यांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.
एस्.टी. महामंडळाने १७ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला !
इंधन दरवाढ, नियमित उत्पन्नातील घट, त्यात कोरोना संसर्गाच्या कालावधीतील आर्थिक फटका यांमुळे महामंडळाला देखभाल-दुरुस्तीसह कर्मचार्यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून ही भाडेवाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिला प्रवाशांना समाजकंटकांचा त्रास होऊ नये, यासाठी रात्री ‘एस्.टी’चे दिवे चालूच ठेवणार ! – राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय
असे वरवरचे उपाय काढण्यापेक्षा समाजकंटकांचे त्रास देण्याचे धारिष्ट्य होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे !
एस्.टी.च्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदावर निवृत्त कर्मचार्याच्या नेमणुकीच्या विरोधात आंदोलन करणार ! – नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना
याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नाडकर्णी यांनी म्हटले आहे की, एस्.टी. प्रशासनाकडे सध्या असलेल्या कर्मचार्यांना वेतन द्यायला पैसे नसून कर्मचार्यांचे ३-३ मासांचे वेतन रखडले आहे.
राज्य परिवहनच्या २६६ बसगाड्यांना ‘कोरोना विषाणू प्रतिबंधक ‘कोटिंग’ !
राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या काही नवीन निर्णयामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंगचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिला प्रयोग म्हणून २६६ बसगाड्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंग करण्यात आले आहे.
प्रवासाच्या वेळी लहान मुलाच्या हातात एस्.टी.चे ‘स्टेअरिंग’ देणार्या संभाजीनगर येथील चालकाचे निलंबन
‘प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये’, अशी सूचनाही अहिरे यांनी केली आहे.