भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक
मुंबई – एस्.टी. महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीच्या दृष्टीने १० नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी येणार्या एस्.टी.च्या कर्मचार्यांना पोलिसांनी नवी मुंबईतील मानखुर्द नाक्यावर रोखले. तेथे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनासाठी मंत्रालयाच्या परिसरात उपस्थित असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले. आमदार पडळकर यांनी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. या मोर्च्याला प्रतिबंध करण्यासाठी मंत्रालयाच्या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पहारा ठेवण्यात आला होता.