वाडी (जिल्‍हा नागपूर) येथे नगर परिषदेच्‍या कार्यालयात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

वाडी नगर परिषदेच्‍या क्षेत्रातील नाली बांधकाम, रस्‍त्‍याची कामे आणि मैदानाची प्रलंबित कामे यांकडे लक्ष वेधण्‍यासाठी मनसेचे काही पदाधिकारी नगर परिषदेच्‍या कार्यालयात गेले होते.

‘ई-स्टोर इंडिया’कडून सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक

ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी २० एप्रिलपर्यंत स्वतःकडील कागदपत्रे घेऊन कणकवली मनसे कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदारांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू – मनसे

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.

चिपळूण येथे नेत्रावती एक्सप्रेसमधील ‘पॅन्ट्री’च्या कर्मचार्‍यांनी ३ फेरीवाल्यांना केली अमानुष मारहाण

मराठी फेरीवाले पोटापाण्यासाठी रेल्वेमध्ये काम करतात; मात्र परप्रांतीयांकडून त्यांना अमानुष मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सहन करणार नाही.

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास का होतो ? – संदीप देशपांडे, मनसे

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई न केल्यास तेथे श्री गणपति मंदिर उभारण्याची मनसेची चेतावणी

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई न केल्यास तेथे श्री गणपति मंदिर उभारण्याची चेतावणी नवी मुंबई, मनसेने दिली आहे. मनसेने या विषयीचे निवेदन सिडको, ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, कांदळवन विभागाचे अधिकारी यांना दिले आहे.

राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा  !

काही दिवसांपूर्वी येथून मोठ्या दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या संशयितांना ग्रामस्‍थांनी पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणाहून कोणते राष्‍ट्र आणि समाज विघातक कृत्‍य घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने या दर्ग्‍यासह येथील सर्व अनधिकृत बांधकाम त्‍वरित हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे

ठाणे पोलिसांनी बजावली ७ जणांना नोटीस

मुंब्रा येथील वन विभागाच्‍या जागेतील अनधिकृत दर्ग्‍यांवर कारवाई केली नाही, तर त्‍याशेजारी हनुमान मंदिर बांधण्‍याची चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती. त्‍यानंतर जाधव यांना धमकी दिल्‍याचा संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता.

ठाणे मनसे अध्‍यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्‍य्रात बंदी !

परिसर संवेदनशील का झाला, याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम हटवण्‍यास सांगणार्‍यांवरच कायद्याचा बडगा उगारण्‍यात येतो. हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात नेमके कसे असायला हवे ?, हे आता जनतेने ठरवायला हवे !