पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्पाच्या कालबद्ध कार्यक्रमाला गती देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोरोनामुळे हे प्राधान्यक्रम ठरवता आले नाहीत; मात्र आता प्राधान्यक्रम ठरवण्याचे काम हाती घेतले आहे. या प्राधान्यक्रमात संभाजीनगर येथील पोलीस वसाहतींचाही समावेश केला जाईल.

मालाड येथील पोलीस हौसिंग फेडरेशनला दिलेला भूखंड परत घेणे विचाराधीन ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मालवणी येथील बेस्ट डेपोलगतचा भूखंड १९९९ मध्ये महाराष्ट्र पोलीस को-ऑप.हौसिंग फेडरेशनला दिला होता. ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता, तसा त्याचा उपयोग झाला नाही.

‘महाराष्ट्राला धोका मंत्र्यांना खोका’ घोषणा देत विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीतील आमदारांनी सत्ताधार्‍यांविरोधात २९ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी हातात ‘टेलीबर्डचे बोके आणि खाली खोके’ हे लिहिलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी गेळे हे अनेक वर्षे गरीब लोकांच्या अज्ञानाचा अपलाभ उठवत, तसेच आमीष दाखवून धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्ग म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाची जीवनवाहिनी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या महामार्गामुळे येणार्‍या ४ वर्षांत  विदर्भाचे चित्र पालटणार आहे. या पुढील काळात नागपूर, वर्धा यांचा विकास झालेला दिसेल. संभाजीनगर-जालना यांचा विकास केवळ या रस्त्यामुळे होईल.

महाराष्ट्राचे वर्ष २०४७ चे विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘मित्र’ संस्थेची स्थापना !

ही संस्था ‘थिंक टँक’ प्रमाणे काम करेल. राज्याचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी ही संस्थेचा मोठा उपयोग होईल. विदर्भाच्या विकासासाठीही याचा उपयोग निश्चित होईल.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषद स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

टाटा सन कंपनीचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् हे या परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील. अभियांत्रिकी, कृषी, वस्त्रोद्योग, शिक्षण, अधिकोष आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत असतील. सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी ही समिती काम करेल.

विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाराष्ट्राचा विचार केला, तर नागपूर येथे १८ सहस्र ७३७, अमरावती येथे ७ सहस्र ६१३ सहस्र रुपयांची गुंतवणूक करून विदर्भावर अन्याय केला आहे.

पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शाळेत शिक्षकांची संख्या अल्प आहे त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण होतील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.