लिपिक पदासाठी मंत्रालयात अधिकार्यांच्या दालनात बोगस मुलाखती, चौकशीचा आदेश !
मुख्य प्रशासकीय केंद्राच्या ठिकाणी बोगस मुलाखती चालणे, ही सरकारची नाचक्की !
मुख्य प्रशासकीय केंद्राच्या ठिकाणी बोगस मुलाखती चालणे, ही सरकारची नाचक्की !
परवाना रहित केलेल्या खत विक्रेता आस्थापनाचा परवाना परत पूर्ववत् केल्यावर त्याच्याकडून तोच गुन्हा परत होणार नाही, याची निश्चिती कोण देणार ?
धाराशीव येथे खड्ड्यांच्या कामात बोगस नावे दाखवून पैसे लाटणार्या १ कोटी १२ लाख रुपयाच्या घोटाळ्याचे पुनर्अन्वेषण करण्याची घोषणा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत केली. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ३० डिसेंबर या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
चालू वर्षात शबरी घरकुल योजनेच्या अंतर्गत ८५ सहस्र घरकुले संमत करण्यात आली आहेत. यासाठी अधिकाधिक अर्ज स्वीकारण्याची सूचना प्रकल्प अधिकार्यांना देण्यात आली आहे. या योजनेत अर्ज करणार्या सर्वांना घरे देण्यात येतील, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण आणि निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला आहे. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणार्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराचे सूत्र
मुंबईतील चित्रपटसृष्टीला कोणत्या कारणासाठी आयुक्तांनी नोटीस काढली आहे ? त्याची माहिती घेऊ आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले.
शहरात ‘हर्बल’च्या (वनौषधींच्या) नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.