महाराष्ट्राचे वर्ष २०४७ चे विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘मित्र’ संस्थेची स्थापना !

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०४७ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रशासनाच्या ‘नीती’ आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही संस्था कार्यरत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. शेवटच्या आठवडा चर्चेनंतर सभागृहात उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

ही संस्था ‘थिंक टँक’ (वैचारिक दिशा देणे)प्रमाणे काम करेल. राज्याच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही संस्था समन्वय साधेल. राज्याचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी ही संस्थेचा मोठा उपयोग होईल. विदर्भाच्या विकासासाठीही याचा उपयोग निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.