नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – प्रसिद्ध अभिनेते प्रसाद खांडेकर हा गुणी कलावंत आहे. ‘हास्यजत्रे’च्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनावर छाप टाकली आहे. मराठी कलावंतांनी सिद्ध केलेल्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नसतील, तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल; पण चित्रपटांसाठी चित्रपटगृहे उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेमध्ये भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मराठी उद्योन्मुख कलावंताने सिद्ध केलेल्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाला काही उद्दाम लोकांकडून चित्रपटगृहे उपलब्ध करून दिली जात नाहीत. यामध्ये शासनाने लक्ष द्यावे. मराठी कलावंतांची होणारी गळचेपी थांबवावी, अशी मागणी केली. त्याला फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत.
त्यांच्या चित्रपटाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल, तर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल.(विधानपरिषद । गुरुवार, दि. 7 डिसेंबर 2023)#Maharashtra #WinterSession2023 #Winter #WinterSession #Nagpur #Adhiveshan #WinterAssemblySession2023… pic.twitter.com/8KXHe3KUu1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023