धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

धार्मिक कार्यक्रमांसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी ! –  रा.स्व. संघाची मागणी

धर्मावरून चालू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाने घटनेच्या अधीन राहून नियमांचे पालन करावे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी.

भोंग्यांविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे.

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

संभाजीनगर येथे भोंगे लावायचे असतील, तर कायदेशीर अनुमती घ्यावी ! – पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, ध्वनीक्षेपकाच्या संदर्भात वर्ष २००५ मध्ये सर्वाेच्च न्यायालय आणि राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे, त्यानुसार अनुमतीविना ध्वनीक्षेपक लावता येत नाही.

मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणारच ! – दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष, मनसे

मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेच्या चेतावणीवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी कायमच कायद्यानुसार कारवाई करावी !

(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?

(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?