नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा निर्णय !

नाशिक – येथील माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा भोंग्यांविषयीचा प्रतिबंधात्मक आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रहित केला आहे. भोंग्यांविषयीची शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नसल्याचे नाईकनवरे यांनी म्हटले आहे.
१७ एप्रिल या दिवशी दीपक पांडेय यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिला होता. त्यांनी सर्व धर्मियांना भोंगे आणि अन्य ध्वनीवर्धक यंत्रणा वाजवण्यासाठी पूर्वानुमती घेण्याचाही आदेश दिला होता. त्यानुसार ३ मेपर्यंत अनुमती न घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार होते. ‘आता हा आदेश रहित केला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल’, असे नवपोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !