Nayab Saini : हरियाणामध्ये भाजपचे नायब सैनी नवे मुख्यमंत्री !

जननायक जनता पक्षाने भाजपसमवेतची युती तोडल्याने सरकार विसर्जित !

नवे मुख्यमंत्री नायब सैनी

चंडीगड – हरियाणामध्ये भाजप आणि जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांची युती तुटल्याने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर सरकार विसर्जित करण्यात आले. यानंतर भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत नायब सैनी यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. जननायक जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून बोलणी फिसकटल्यामुळे युती तोडल्याचे म्हटले जात आहे. दुष्यंत चौटाला हे जेजेपीचे अध्यक्ष असून ते सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

हरियाणा विधानसभेतील पक्षीय बलाबल !

हरियाणा विधानसभेच्या वर्ष २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यानंजर भाजप आणि जेजेपी यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. राज्यात भाजपला ४१, जेजेपीकडे १०, काँग्रेस ३०, अपक्ष ७ आणि दोन पक्षांना प्रत्येकी १ जागा आहे.