Goa LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारीअखेर किंवा मार्चपर्यंत येण्याची शक्यता !

पणजी, ३० जानेवारी : लोकसभा निवडणुकीची घोषणा करणारी अधिसूचना फेब्रुवारीअखेर किंवा मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार घोषित केले जातील, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

‘दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक कार्यालयेही १५ फेब्रुवारीपर्यंत चालू होतील’, असेही ते म्हणाले. संभाव्य विजयी उमेदवारांचे सर्वेक्षण शून्यावर करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ नेते म्हणाले. पणजी-फोंडा महामार्गाजवळ मेरशी येथे ‘भाजप भवन’ उभारणार असल्याची घोषणाही तानावडे यांनी केली. या संदर्भात कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी (तात्पुरता पदभार सांभाळणारे) आशिष सूद हे गोव्यात पक्षाच्या नेत्यांची भेट घेत असून आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करत असल्याची माहितीही तानावडे यांनी दिली.