संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

संजय निरूपम

मुंबई – काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. ३ एप्रिल या दिवशी संजय निरूपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून काँग्रेसने ६ वर्षांसाठी निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.