बारामतीत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – जिल्ह्यात तिसर्‍या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे या दिवशी मतदान झाले. मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले होते. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन दिवसे यांनी केले होते.

संपादकीय भूमिका :

भरपगारी सुटी मिळूनही बारामतीत मतदानाचा टक्का सर्वांत अल्प असणे, हे कशाचे निर्देशक आहे ?