नाशिक येथे श्री शांतीगिरी महाराज अपक्ष लोकसभा लढवण्यावर ठाम !

भक्त परिवाराचे लागलेले फलक चर्चेत !

नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिकमधून अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे अप्रसन्न जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी आवेदन भरले होते; मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला आहे, दुसरीकडे श्री शांतीगिरी महाराज यांनी ‘निवडणुकीतून माघार घेणार नाही’, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवतील.

श्री शांतीगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावे लागते’ अशी माहिती असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांची सर्वत्र चर्चा चालू आहे. या माध्यमातून एक प्रकारे हेमंत गोडसे आणि महायुती यांना आव्हान देण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ६ मे या दिवशी उमेदवारी आवेदन मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता.