लोकसभा निवडणुका : तिसर्‍या टप्प्यात देशभरात सरासरी ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

गोव्यात ७४.३२ टक्के, तर महाराष्ट्रात ५५ टक्क्यांहून अधिक मतदान !

 नवी देहली – ७ मे या दिवशी लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडला. यांतर्गत देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील ९३ लोकसभा जागांसाठी मतदान करण्यात आले. यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, छत्तीसगड, गुजरात, दादरा आणि नगरहवेली, दमण अन् दीव, तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत, तसेच केंद्रशासित प्रदेशांत मतदान पार पडले. या वेळी सर्वाधिक आसाम राज्यात ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर सर्वांत अल्प मतदान महाराष्ट्रात (५३ टक्क्यांहून अधिक) झाले. गोव्यात ७४ टक्क्यांहून अधिक, तर शेजारील कर्नाटकात ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.