हरिद्वार कुंभमेळ्याला जाण्यासाठीची अनिवार्य असलेली नोंदणी रहित !

उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा निर्णय

तीरथसिंह रावत

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यावर नवीन मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी सर्वप्रथम हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये येण्यासाठीची अनिवार्य करण्यात आलेली नोंदणी रहित केली आहे. त्यामुळे आता कोणताही भाविक थेट या कुंभमेळ्यासाठी जाऊ शकणार आहे. यामुळे पूर्वीच्या त्रिवेंद्रसिंह रावत सरकारने कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून बनवलेले कुंभमेळ्यासाठीचे अन्य सर्व नियम यामुळे आपसूक रहित होणार आहेत.