पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार !

राज्यशासनाने सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना विनामूल्य प्रवासाचा निर्णय रहित केला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा (‘के.एम्.टी.’चा) प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी  अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नृसिंहवाडी-सांगली, नृसिंहवाडी-हुपरी, नृसिंहवाडी-कोल्हापूर, इचलकरंजी यांचा समावेश आहे.

तरुणीवर बलात्कार करणार्‍या जब्बार ख्वाजा अहमद नदाफला अटक !

सुविधा मिळवण्यात अल्पसंख्य, तर गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असलेले धर्मांध !

कृष्णेतील प्रदूषणास साखर कारखाने, नगरपरिषदा, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकाच उत्तरदायी ! – राष्ट्रीय हरित लवाद

राष्ट्रीय हरित लवादाने साखर कारखाने, नगरपरिषदा, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रदूषणाला उत्तरदायी आहे, असे सांगितले आहे.

हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ असल्याने धर्मांतरास बळी पडू नका ! – पू. ईश्वरबुवा रामदासी

हिंदु धर्मात जन्माला येणे, ही पुष्कळ पुण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माचे परकियांपासून रक्षण करण्यासाठी स्वतःचे जीवन सार्थकी लावले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ग्रंथालयास वर्ष १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित ‘गुरुचरित्र’ प्राप्त !

ज्या भाविकांकडे असे दुर्मिळ ग्रंथ असतील, त्यांनी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला द्यावेत, असे आवाहन सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.

पंचगंगा नदीप्रदूषण प्रकरणी महापालिकेला प्रदूषण मंडळाची नोटीस !

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी जयंती नाल्यासह ६ नाल्यांमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्या संदर्भात तक्रारी केल्या.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन !

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधीच्या प्रतिकात्मक ‘पोस्टर’ला ‘जोडे मारा’ आंदोलन !

ठाणे येथे शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.