पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार !

कोल्हापूर – राज्यशासनाने सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना विनामूल्य प्रवासाचा निर्णय रहित केला आहे. त्याऐवजी पोलिसांना वेतनातून वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा (‘के.एम्.टी.’चा) प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला पत्र पाठवून यापुढे पोलिसांना के.एम्.टी. प्रवास करतांना विनातिकीट प्रवास करता येणार नसल्याचे कळवले आहे.