कोल्हापूर एस्.टी. विभागासाठी लवकरच इलेक्ट्रिक बस मिळणार !

उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रवाशांना अधिक प्रमाणात गाड्या उपलब्ध होण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई या मार्गावर अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटक येथील ३५० वर्षे जुन्या समाधीची दुरवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शहाजी महाराज यांचे समाधीस्थळ विकसित न करणे हे लज्जास्पद !

पश्चिम महाराष्ट्रात गदापूजन करून हनुमंताला हिंदु राष्ट्रासाठी साकडे !

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे २७० हून अधिक ठिकाणी गदापूजन, सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन.

जोतिबा यात्रेच्या (जिल्हा कोल्हापूर) काळात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त !

जोतिबा देवाच्या यात्रेच्या काळात जोतिबा डोंगर, तसेच कोल्हापूर बसस्थानक येथे झालेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त झाले आहेत. जोतिबाच्या डोंगरावर गळ्यातील साखळी, मंगळसूत्र चोरून नेणे, खिशातील पाकीट चोरून नेणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने !

अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन पंचांच्या साक्षी !    

या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली.

संत बाळूमामा देवस्थानचे (जिल्हा कोल्हापूर) संचालक आणि सरपंच यांच्यात कोल्हापूर शहरात मारामारी !

‘श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत.

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे अधिवेशन असले तरी हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संघभाव निर्माण होऊन ‘संघेशक्ती: कलौयुगे ।’या धर्मवचनाप्रमाणे धर्मावर होणार्‍या आघातांचा संघटितपणे विरोध करण्याची दिशा निश्चित करण्यासाठी हे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आहे,

कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ ! – राहुल चिकोडे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !

‘‘यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत असतात. त्यांना पोटभर जेवण मिळावे, याकरता ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने भोजन देण्यात येते.