कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन पंचांच्या साक्षी !    

कॉ. गोविंद पानसरे

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी, संशयित भारत कुरणे यांच्या वतीने अधिवक्ता प्रवीण करोशी यांनी आणि संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पंचांची उलट तपासणी घेतली. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.