
कोल्हापूर – आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानचे संचालक आणि सरपंच यांच्यात राजारामपुरी परिसरात हाणामारीची घटना ३ एप्रिलला घडली. देवस्थान समितीचा कारभार आणि संचालक यांची नेमणूक यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
‘श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत. संचालक नेमणूक आणि मंदिरात चालू असलेल्या कारभाराच्या संदर्भात आदमापूर येथील सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या संदर्भात ते अधिवक्त्यांना भेटण्यासाठी कोल्हापुरात आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांचे साथीदार यांच्यात जोरदार वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न