वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

‘वक्‍फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्‍थानकाशेजारी हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना देण्‍यात आले.

आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !

आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या धर्मांध प्राध्यापकावरील गुन्हा रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

‘अशा राष्ट्रघातकी वृत्तीच्या प्राध्यापकांच्या हाताखाली विद्यार्थी नव्हे, तर देशद्रोहीच निपजतील. सरकारने अशा पाकप्रेमींना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे !’

ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

गेल्या ६ मासांपासून दीड कोटी रुपयांचा निधी प्रलंबित !

दिव्यांग निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन !, शिवसेना अपंग साहाय्य सेनेचे निवेदन

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे ! – उद्धव ठाकरे गट

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काही संबंध नव्हता, असे वक्तव्य केले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील १ सहस्र ग्रामपंचायतींना विकासासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी वर्ग !

जिल्ह्यातील १ सहस्र १५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील १५ व्या वित्त आयोगातील निधीचा दुसरा हप्ता ४७ कोटी ७२ लाख १० सहस्र रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहील ! – अमल महाडिक, माजी आमदार, भाजप

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे निरर्थक आरोप करत आहेत. हा कारखाना गेली २८ वर्षे आम्ही लोकशाही पद्धतीने चालवत आहे.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी फरशीवर ‘कूल कोट’ देण्यात येणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंदिर परिसरात फिरतांना भाविकांच्या पायाला चटके बसतात.