कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ ! – राहुल चिकोडे

कोल्हापूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत भाजपच्या वतीने कोल्हापूर येथे ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली. गौरव यात्रेच्या संदर्भात नुकतीच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

कार्यकर्त्यांच्या बैठकीत माहिती देतांना राहुल चिकोडे (डावीकडून चौथे, हातात माईक घेतलेले), तसेच अन्य मान्यवर

संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास आणि विविध घटना यांचे विस्तृत विवेचन कार्यकर्त्यांना केले. ४ एप्रिलला दुपारी ४ वाजता मिरजकर तिकटीपासून या यात्रेचा प्रारंभ होईल. येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गौरव यात्रेचा समारोप होणार आहे.