दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

कोरोना महामारीमुळे आलेला आपत्काळ आणि दळणवळण बंदीच्या काळात सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. अशा वेळी सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले…..

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.

विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, समन्वयक, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत…

राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !

लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.

कोल्हापूर महापालिकेचा ६२३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प संमत

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन यांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने निदर्शने

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून खोडसाळपणा ! – जयसिंगपूर पोलीस

जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कोल्हापूर बॉम्बशोधक पथकाने याविषयी सखोल पहाणी केल्यावर यात ठेवलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले आढळले. यात कोणतीही स्फोटके मिळालेली नाहीत.

शासकीय संकेतस्थळावर श्री महालक्ष्मी देवीसह कोल्हापूर जिल्ह्यातील चुकीचे ऐतिहासिक संदर्भ : भाविकांमध्ये संतापाची लाट

जिल्हा प्रशासनाच्या वतीने kolhapur.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ चालवण्यात येते. या संकेतस्थळावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चुकीची माहिती देण्यात आली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाची गडावर जाऊन पहाणी करणार ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्‍वासन

विशाळगडावरील अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी,यासाठी कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि यावल येथे दिले निवेदन

आज विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे घंटानाद आंदोलन !

विशाळगड येथील अतिक्रमण, विशाळगडावरील मंदिरे आणि गडकोट यांची दूरवस्था, तसेच या संदर्भात जागृती करण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे १९ मार्च या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत घंटानाद आंदोलन घेण्यात येणार आहे.