श्री महालक्ष्मी किरणोत्सव समाप्त, कोल्हापूर
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथील किरणोत्सवाची समाप्ती झाली.
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथील किरणोत्सवाची समाप्ती झाली.
‘कोल्हापूर हायकर्स’च्या वतीने शुक्रवार, १० नोव्हेंबरला पन्हाळगडावर ‘दीपोत्सव’ होत आहे. गेली ११ वर्षे हा उपक्रम चालू असून तो सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री शिवछत्रपती मंदिर ते महाराणी ताराराणी राजवाड्यापर्यंत दीप लावून साजरा केला जाणार आहे.
उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून ‘पी.एम्. इ-बससेवा’ प्रकल्प चालू असून त्याअंतर्गत कोल्हापूर शहराला १०० वातानुकूलित इ-बसगाड्या संमत करण्यात आल्या आहेत. ही कोल्हापूरला दिवाळी भेट आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध नेत्यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि इचलकरंजी अशा २ ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या.
समाजातील पारंपरिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी देणारी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना असल्याचे प्रतिपादन ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रा. अनिल सोले यांनी केले.
८ नोव्हेंबरला सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पहाटेपासूनच चालू झालेल्या प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कोल्हापूर शहरासह राधानगरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.
कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन आणि संवर्धन करून जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा.
निळे येथील ‘श्री विठलाईदेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या.’च्या सभासदांना १२ टक्के लाभांश प्रदान करण्यात आला. श्री. उदयसिंह कोकरे-देसाई संस्थापक असलेल्या या सोसायटीच्या ६० सदस्यांना या प्रसंगी सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे संच भेट देण्यात आले.
लाखो भाविक ज्या कुंडात स्नान करतात ते कुंड वर्षानुवर्षे अस्वच्छ असणे आणि त्यासाठी विधीवर बहिष्कार घालण्याची वेळ येणे, हे प्रशासकीय व्यवस्थेसाठी लज्जास्पद आहे !