सांगली, २१ मार्च (वार्ता.) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यागपत्रे द्यावे, या मागणीसाठी सांगलीत शहर भाजपच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
या प्रसंगी संघटन चिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक, संजय कुलकर्णी, युवराज बावडेकर, संदीप आवटी, सुबराव मद्रासी, ओबीसी मोर्चाचे अमर पडळकर, नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, सोनाली सगरे, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवळकर यांसह अन्य कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरात बिंदू चौक येथे निदर्शने !
कोल्हापूर – याच मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुति भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.