३० नोव्हेंबरपर्यंत कर भरा, अन्यथा जप्तीची कारवाई ! – शीतल तेली-उगले, महापालिका आयुक्त, सोलापूर

नागरिकांनी महापालिकेचा कर ३० नोव्हेंबरपूर्वी भरावा. यानंतर थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागास आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची ‘तीर्थक्षेत्र बचाव समिती’ समवेत बैठक !

‘कॉरिडॉर’ची (विकास आराखड्याची) कार्यवाही करतांना स्थानिक आणि बाधित नागरिक अन् व्यापारी यांना विश्वासात घेतल्याविना काहीही होणार नाही. सर्व नागरिकांच्या सूचनांचा १०० टक्के विचार करूनच पुढील निर्णय घेतले जातील.

‘२६/११’च्या आक्रमणात वीरमरण आलेले सैनिक आणि पोलीस यांना राज्यपाल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली

या आक्रमणात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३४ विदेशी नागरिकांचाही समावेश होता. ७०० हून अधिक जण घायाळ झाले होते. आतंकवाद्यांच्या या आक्रमणात १८ पोलिसांना वीरमरण आले.

मिरज (जि. सांगली) : धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित असलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे निवेदन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती मिरज’च्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.

शहरातील पथदिवे बंद असल्यास ‘ऑनलाईन’ तक्रार करा ! – शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट करावी. २४ घंट्यांच्या आत दिवे चालू करण्यात येतील – महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले

अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या करण्यासाठी माझ्यावर दबाव !

केरळमध्ये सरकारी जागांवर नेमणुका करतांना सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या लोकांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

पाश्‍चात्त्य देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वीकारावे !

मी अन्य लोकांच्या (पाश्‍चात्त्य देशांच्या) मागण्यांनुसार परराष्ट्र धोरण आखत नाही. माझे परराष्ट्र धोरण हे माझा देश आणि माझे नागरिक यांच्या हितासाठी आहे.

पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरण यांच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात येईल.

चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील २२ झाडे ठेकेदाराने विनाअनुमती तोडली !

तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा माफीचे पत्र पाठवले ! – सुधांशू त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप  

छत्रपतींनी मागितलेली माफी ही शत्रूला चकवा देण्यासाठी राबवलेल्या कूटनीतीचा भाग होता. त्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांना पाठवलेले माफीपत्र, हाही कूटनीतीचा भाग होता.