रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ जणांनी केला सामूहिक बलात्कार !

रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात असलेल्या एका रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेचे सहकारी दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. त्यामुळे ती एकटीच रुग्णालयात काम करत होती. या दुष्कृत्याचे चित्रीकरण करण्यात आले. बलात्कार्‍यांनी परिचारिकेला धमकावले की, जर ती पोलिसांकडे गेली, तर तिला जिवे मारण्यात येईल. तरीही तिच्या आई-वडिलांना याविषयी समजल्यावर त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. चारपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना आजन्म कारावासाची शिक्षाच व्हायला हवी !