गडचिरोली – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या कोठी येथील शासकीय आश्रमशाळेतील २२ विद्यार्थ्यांना ५ डिसेंबर या दिवशी विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून वैद्यकीय पडताळणीनंतर यातील १८ विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.
५ डिसेंबर या दिवशी सकाळी इयत्ता ६ वीच्या एका विद्यार्थिनीने डब्यातून आंबाडीची भाजी आणली होती. तिने ती आपल्या मैत्रिणींसमवेत वाटून खाली. यानंतर काही मुलांना पोटदुखी आणि उलट्या यांचा त्रास झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी विद्यार्थ्यांची पडताळणी करून औषधोपचार चालू केले.