नागपूरमधील मेयो रुग्‍णालयात महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

येथील मेयो रुग्‍णालयामध्‍ये महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात बुरखा घालून फिरणार्‍या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्‍यात आली. गेल्‍या १५ दिवसांपासून तो रुग्‍णालयात अधूनमधून महिलेच्‍या वेशात फिरत होता.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्‍णालयातील परिचारिकांचे वेतनवाढीसाठी आंदोलन !

या आंदोलनात परिचारिका मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍या होत्‍या. ‘परिचारिकांना सुधारित वेतनश्रेणी वाढवून मिळालीच पाहिजे’, अशी मागणी ‘महाराष्‍ट्र गव्‍हर्मेंट नर्सेस फेडरेशन’च्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

सिंधुदुर्ग : आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गत ६ मासांपासून बंद !

६ मास नागरिकांना आरोग्य केंद्रासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून न देणे प्रशासनाला लज्जास्पद ! प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन अन् उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

ओडिशातील अपघातग्रस्तांना रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्याकडून साहाय्य

किती इस्लामी आणि ख्रिस्ती संघटना अशा प्रकारचे कार्य करतात ? हिंदूंच्या  या संघटनांवर बंदीची मागणी करणार्‍या किती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते साहाय्यासाठी धावून आले, हेही त्यांनी सांगायला हवे !

पाटलीपुत्र (बिहार) येथील पारस रुग्णालयात अडीच वर्षांपासून कार्यरत फारूकी नावाचा बनावट डॉक्टर बडतर्फ !

जर केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयी माहिती दिली नसती, तर हा बनावट डॉक्टर तसाच कार्यरत राहिला असता ! त्यामुळे त्याला नोकरीवर ठेवून रुग्णांचे जीव धोक्यात घालणार्‍या रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !

रुग्णाला मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे नेतांना रुग्णवाहिका बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ

या घटनेमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा गंभीर स्थितीतील रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे शासनाने चांगल्या स्थितीतील रुग्णवाहिका रुग्णालयांना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

अमेरिकेत हिंदु रुग्णांची श्रद्धा जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना करावा लागणार ‘क्रॅश कोर्स’!

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिंदु रुग्ण रुग्णालयांच्या खाटेवर प्रार्थना करू शकतील. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती समवेत ठेवू शकतील. अमेरिकेत प्रथमच अशा प्रकारची अनुमती देण्यात आली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यावर गुन्हा नोंद का ? 

‘कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील माणगाव-वाडोस मार्गावरून प्रवास करतांना आंबेरी येथे दुचाकीस्वार सीताराम भिकाजी शृंगारे (वय ६० वर्षे, रहाणार ओटवणे, सावंतवाडी) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.

मोकाट कुत्र्यांना पकडू न शकणारे महाराष्ट्र प्रशासन आतंकवाद्यांचा बंदोबस्त कधी करू शकेल का ?

‘४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.’

नाशिक येथे ७० रुग्णालये विनानोंदणी; महापालिकेकडून नोटिसांचा बडगा !

प्रामुख्याने परिचारिकांची नोंदणी प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला आदी कारणास्तव नोंदणीमध्ये बाधा येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.