पाचव्या मजल्यावरून खाली पडून बालिकेचा मृत्यू

प्रतिकात्मक चित्र

डोंबिवली – इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून अवनी पाठक (वय ४ वर्षे) ही गंभीर घायाळ झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. १५ ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला. तिच्या घराच्या खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या. त्यामुळे तेथून तोल जाऊन ती खाली पडली.