रुग्‍णास भरती करून घेण्‍यास नकार दिल्‍याने संबंधित डॉक्‍टरांचे स्‍थानांतर !

पिंपरी (पुणे) येथील जिजामाता रुग्‍णालयामधील घटना !

प्रतीकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – महापालिकेच्‍या जिजामाता रुग्‍णालयामध्‍ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एका रुग्‍णाला भरती करून घेण्‍यास आधुनिक वैद्या वैशाली यांनी नकार दिला. ‘त्‍यांचे तात्‍काळ निलंबन करण्‍यात यावे’, अशी मागणी ‘जागृत नागरिक महासंघा’ने केली. अशा आशयाचे निवेदन मुख्‍य आरोग्‍य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्‍याकडे सादर केले. ‘संबंधित डॉक्‍टरांवर तात्‍काळ कारवाई केली आहे. त्‍यांना दुसर्‍या विभागामध्‍ये स्‍थानांतर केले आहे. त्‍यांच्‍याकडून पुन्‍हा असे काही होणार नाही’, असे जिजामाता रुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. सुनीता साळवे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

स्‍थानांतर म्‍हणजे केलेल्‍या चुकीचे समर्थनच करणे नव्‍हे का ? नकार का दिला, हे समजून घेऊन त्‍याप्रमाणे उपाययोजना काढणेही आवश्‍यक !