वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान

‘जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे, …’ हे गीत ऐकल्यानंतरही आपण केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ एवढीच मागणी का करतो ? जम्बूदीपची संरचना एवढी मोठी आहे, की ज्यात आजचे चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील सर्व देश सहभागी आहेत !

हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोहाचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ ! – विश्वनाथ कुलकर्णी, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार

आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात.

उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल ! – रवींद्र प्रभूदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह

आज कलियुगामध्ये अर्थशक्तीचा अधिक प्रभाव आहे. तुमच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, ही तुमचे दायित्व आहे. त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यामुळे आपला नफा वाढतो, तसेच हिंदु धर्माची सेवा होते.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे.

तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार

नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला, तसेच ‘गड-दुर्ग संवर्धन मोर्चा’ आणि आगामी चित्रपट ‘सुभेदार’ यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

धर्मांतर रोखून सनातन धर्माचे रक्षण करू, अशी प्रतिज्ञा करा ! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा

मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. त्यामुळे प्रथम हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा.

हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परूळकर, लेखक आणि व्याख्याते, ठाणे

औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.