जुन्नर (पुणे) येथे लक्ष्मीपूजनादिनी ६ गोवंशियांची सुटका !

३ धर्मांधांना अटक; पोलिसांवर जमाव जमवून अरेरावी !

प्रतिकात्मक चित्र

जुन्नर (जिल्हा पुणे) – शहरातील कसाई मोहल्ल्यात वध (कत्तल) करण्याच्या उद्देशाने ६ गोवंश बांधून ठेवले आहेत, अशी माहिती मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना समजली. त्यांनी सहकारी गोरक्षक शिवराज संगनाळे यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यास सांगितले. या गोवंशियांची सुटका पोलीस आणि गोरक्षक यांकडून करण्यात आली. ही घटना लक्ष्मीपूजनदिनी घडली. कारवाई करण्याच्या वेळी पोलिसांना अरेरावी आणि दमदाटी करत रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुफ्तार गफूर कुरेशी, त्याचा मुलगा आणि बाबा बेपारी यांच्याविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका :

गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !