जनता धर्मनिष्ठ नसल्यास तिला कायद्याच्या साहाय्यानेच नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे लागते !
‘धर्माप्रमाणे योग्य आणि प्रशंसनीय कृती करणार्याला पारितोषिक देणे अन् अयोग्य कर्म करणार्याला दंड करणे.’ जे शासन या सिद्धांताचे कठोरपणे पालन करवून घेते, तेथील समाज शिस्तप्रिय रहातो.