उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. देवकी जयदीप जठार !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशीला चि. देवकी जयदीप जठार (वय ३ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

विनयशील, स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेले आणि भावपूर्णरित्या सेवा करणारे सोलापूर येथील श्री. विक्रम लोंढे !

दळणवळण बंदीमध्ये चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात श्री. विक्रम लोंढे सहभागी होतात. त्यांच्यात आधीपासूनच साधकत्व आहे. येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

प्रेमाने सर्वांशी जवळीक साधणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या अकलूज येथील सौ. प्रियांका जयदीप जठार !

सौ. प्रियांका जठार या साधना करतांना त्या घराचे दायित्व सांभाळून त्यांनी प्रेमभावाने सर्वांना जोडून ठेवले आहे. त्यांच्या सासूबाईंना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये . . .

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

जीवनातील कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर सामोरे जाणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

३ नोव्हेंबर या दिवशी येथील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली.

साधकांवर मातृवत प्रेम करणार्‍या आणि तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

पू. (कु.) दीपाली मतकर या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथील एका सोहळ्यात घोषित केले.

‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ।’ ही पंक्ती सार्थ करून साधकांना भावविभोर करणारा पू. (कु.) दीपाली मतकर यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

साधनेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करणार्‍या, तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ‘संत सन्मान’ सोहळा म्हणजे भावसोहळाच !

सोलापूर येथील कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.